पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला

Vartapatra    01-Jul-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra christianity_7.jpg
 
पुण्यातील पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. 'केवळ येशूला देव माना, ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल' असे म्हणून पिंपरी कॅम्प येथे धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफर जाविन जेकब, स्टीव्हन विजय कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यांच्यासह १६ वर्षीय बालकाचा यात समावेश आहे. शेफर जेकब आणि स्टीव्हन कदम हे हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता.
 
नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन येशू विषयी माहिती देत होते. ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे, हे लोकांना सांगत होते. पैशांचे आमिष देखील दाखवत होते. अखेर याप्रकरणी काही सजग नागरिकांनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिकाला अटक केली आहे.

एबीपी माझा २८/७/२५