पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव घटक यांचा समतोल. पर्यावरणाचे महत्त्व प्रत्येक मनुष्याला वाटले पाहिजे कारण ते आपल्याला अन्न,पाणी, हवा यासारख्या अत्यावश्यक गोष्टी पुरवते. पृथ्वीवरील परिसंस्थेचे संतुलन राखण्याचे काम पर्यावरण करते. स्वच्छ पर्यावरणामुळे मनुष्याचे आरोग्य चांगले रहाते. त्यामुळे फक्त मनुष्यच नव्हे तर प्रत्येक सजीवासाठी पर्यावरणाला अतिशय महत्त्व आहे.
२०२५च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे 'प्लास्टिक प्रदूषण संपवा'(Beat Plastic Pollution)
या थीमचा उद्देश प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबद्दल जनजागृती करणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही आहे..संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) दरवर्षी जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी साजरा केला जातो.
इंटरनेटवरून