झाडांच्या उपचारासाठी महाराष्ट्रातील पहिली ' झाडांची रुग्णवाहिका'

Vartapatra    04-Jun-2025
Total Views |
 
Sanskrutik Vartapatra_Anya_53
 
शहराच्या पर्यावरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून महाराष्ट्रातील पहिली 'झाडांची रुग्णवाहिका' (Tree Ambulance)' लवकरच पुण्यात सेवेत दाखल होणार आहे. पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग तसेच पर्यावरण संवध्ार्नासाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या विविध संस्था आणि कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा अभिनव उपक्रम साकारला जात आहे.
'अंघोळीची गोळी' आणि 'खिळेमुक्त झाडं' या मोहिमांद्वारे गेली सात वर्षं झाडांवरील खिळे काढण्याचे काम सतत सुरू आहे असे पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सांगितले.५ जूनपासून सुरू होणारी झाडांची रुग्णवाहिका' (Tree Ambulance) झाडांच्या दुखापतीची तातडीने दखल घेऊन उपचार करणारा एक अनोखा उपक्रम ठरेल. झाडांभोवती असलेले पिंजरे, झाडांच्या कुंपणाभोवती असलेले पेव्हर ब्लॉक हे काढण्याचे कामदेखील याद्वारे केलं जाणार आहे. हवामान बदलाच्या संकटात ही सेवा मोठा फरक घडवू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पुढारी ३.६.२५