कापसाचे भरघोस उत्पन्न मिळणार! महाबीजचं नवीन वाण

Vartapatra    03-Jun-2025
Total Views |

 
sanskrutik vartapatra krushi_

मुंबई : हवामान बदल आणि पावसातील अनिश्चिततेचा सामना करत असलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथील राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले ‘महाबीटी बीजी-2’ हे नवीन संकरित बीटी कापूस वाण आता शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे.

महाबीज-124 चे वैशिष्ट्ये काय?

राज्य बियाणे महामंडळाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या प्रगत संशोधन केंद्रात तयार करण्यात आलेल्या या वाणाचे अधिकृत अनावरण नुकतेच शनिवारी करण्यात आले. ‘महाबीज-124’ या नावाने बाजारात उपलब्ध होणारे हे संकरित वाण विशेषतः कोरडवाहू भागांतील शेतकऱ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. “हे वाण कमी पावसातही अधिक उत्पादन देणारे असून, ते शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल.”

News 18 Marathi 25.5.25