जवानांच्या हाती लवकरच स्वदेशी बंदूक

Vartapatra    27-Jun-2025
Total Views |
 Sanskrutik Vartapatra_Anya_70 
भारतीय जवानांच्या हाती लवकरच स्वदेशी बनावटीची बंदूक दिसणार आहे. सध्या वापरात असलेल्या स्टर्लिंग कार्बाइनच्या जागी आधुनिक मशिनगन क्लोज क्वार्टर बॅटल (सीक्यूबी) कार्बाइन वापरात येणार आहे. लष्कराकडून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडला सीक्यूबी कार्बाइन तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून ही सब मशिनगन वापरात असल्याने काळानुरूप ती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी बंदूक हलकी असून जवळच्या चकमकीमध्ये लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. डिझाईनमध्ये ऑप्टिक्स, लेझर डिझायनर्स आणि अॅक्सेसरीज
समाविष्ट करण्यात आल्या आहेत
 
म.टा २६.६.२५