जर आपल्या शरीराचा कोणताही भाग दुखावला किंवा ओरखडा ओढला तरी आपल्याला वेदना होतात तर मग आपले केस किंवा नखे कापताना वेदना का होत नाहीत? तर त्याचे कारण नखे आणि केस यामध्ये मृत पेशी असतात, त्यामुळे ते कापताना वेदना होत नाहीत. नखे आणि केसांच्या मृत पेशींमध्ये केराटीन नावाचे प्रथिन असते जे पूर्णपणे निर्जीव असते. तिथे वेदनांची संवेदना वाहून नेणारे चेतातंतू नसतात. हेही वेदना न होण्यामागचे कारण आहे. मात्र आपण जेव्हा त्वचेच्या अगदी जवळून नखे कापतो तेव्हा मात्र आपल्याला वेदना होतात.
पुढारी २४.६.२५.