माहीत असावं असं काही

Vartapatra    24-Jun-2025
Total Views |
 
Sanskrutik Vartapatra_Anya_67
 
होडुंरासच्या दुर्गम मोस्केशिया प्रदेशातील जंगलात शास्त्रज्ञांच्या पथकाने एका प्राचीन शहराचे अवशेष शोधून काढले आहेत. ज्याला तेथील स्थानिक लोक 'सिउदाद ब्लांका' किंवा 'पांढरे शहर' म्हणून ओळखतात. या शहराला 'माकडांच्या देवांचे शहर' (City of Monkey God) असेही म्हटले जाते. याचे कारण एका आख्यायिकेनुसार येथील रहिवाशांनी माकडाच्या मूर्तींची पूजा करण्यासाठी हे शहर सोडले होते.
या शहराच्या विस्तार आणि रचना पाहता, असे दिसते की येथे एक अत्यंत संघटित आणि समृद्ध समाज नांदत होता, ज्यांच्याबद्दल इतिहासाला काहीही माहीत नाही. येथील लोक अतिशय कुशल कारागीर होते. तसेच त्यांची स्वतःची धार्मिक आणि सामाजिक रचना होती. एकंदरीतच त्यांचे स्थान होंडुरासच्याच नव्हे तर संपूर्ण मध्य अमेरिकेच्या प्राचीन इतिहासावर नवीन प्रकाश टाकणारा आहे.

पुढारी २३.६.२५.