अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास

Vartapatra    14-Jun-2025
Total Views |
 
Sanskrutik Vartapatra_Mahila_20
 
वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी वेदश्री तोरस्करने इतिहास रचला आहे. मुंबईतील अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत १७ किमी पोहण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. आश्चर्याची बाब म्हणजे ३ तास ५ मिनिटांत साध्य केलेला हा असाधारण पराक्रम तिचा दृढनिश्चय, कौशल्य आणि पोहण्याच्या आवडीचं दाखवून देतो. सर्वांनीच आता वेदश्रीचं कौतुक केलं आहे.
वेदश्रीने अटल सेतू येथे अरबी समुद्रात पाण्याचा जोरदार प्रवाह, लाटा आणि थंड पाणी याचं पोहताना आव्हान पेललं. हवामानाची पर्वा न करता, ती १७ किमी पोहत गेटवे ऑफ इंडियावर पोहोचली आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं. महाराष्ट्र राज्य एमेच्योर एक्वेटिक एसोसिएशन (MSAAA) प्रमाणित केलेली तिची ही कामगिरी केवळ तिची शारीरिक ताकदच नव्हे तर इतक्या लहान वयात असलेली हिंमत दाखवून देत आहे. पोहण्याचा प्रवास तिचा अनेक वर्षांपूर्वीच सुरू झाला आहे. एका प्रतिष्ठित स्विमिंग एकॅडमीतील तिच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, तिने दररोजच्या सराव सत्रांद्वारे कौशल्य वाढवलं. तिच्या प्रशिक्षणात सहनशक्ती, ताकद, व्यायाम आणि खुल्या पाण्यात पोहण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मानसिक तयारी यांचा समावेश होता. वय कमी असलेल्या वेदश्रीने कठोर परिश्रम घेतले आहेत. समुद्रात पोहणं सोपं नाही. वेदश्रीने अनेक अडथळ्यांना तोंड दिलं. वेदश्रीच्या कामगिरीने भारतातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. शाळा, नातेवाईक आणि क्रीडा संघटनांनी तिच्या या कामगिरीचा आनंद साजरा केला आहे. तिचा गौरव केला आहे. वेदश्री तोरस्करचा अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा १७ किमीचा पोहण्याचा अनुभव केवळ एक विक्रम नाही तर तो धैर्य, समर्पण आणि अफाट क्षमतेचे प्रतीक आहे.

लोकमत ७/६/२५