अनेक दशकांपासून, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, चेतापेशी (न्यूरॉन्स) याचं मेंदूतील विचार आणि स्मृतींचे एकमेव शिल्पकार आहेत. परंतु, आता एका नवीन संशोधनाने या धारणेला आव्हान दिले आहे. या संशोधनानुसार मेंदूतील एक दुर्लक्षित पेशी प्रकार अॅस्ट्रोसाईट्स (तारापेशी), स्मृती प्रक्रियेत पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे.
मे महिन्यात 'पीएनएएस' (Proceedings of the National Academy of Sciences) या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, अॅस्ट्रोसाईट्स मेंदूच्या अफाट स्मृती-साठवण क्षमतेसाठी एका नवीन प्रकारच्या नेटवर्क संरचनेद्वारे जबाबदार असू शकतात.
पुढारी ११.६.२५.