ब्रिक्स संसदीय मंचा'कडून पाकपुरस्कृत दहशतवादाचा निषेध

Vartapatra    10-Jun-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra dahashatvad_18
 
ब्रिक्स संसदीय मंचा'ने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दहशतवादाविरुद्ध भारताला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चीन आणि मुस्लीम देशांचा भारतास पाठिंबा पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरला आहे.
'ब्रिक्स संसदीय मंचा' मध्ये चीनसह अनेक मुस्लीम देशांचाही समावेश आहे. या मंचात भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, संयुक्त अरब
आणि इंडोनेशियाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बैठकीत भारताचे नेतृत्व केले. आपल्या भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, "दहशतवाद आज एक जागर्तिक संकट बनला आहे, ज्याचा सामना केवळ आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच करता येईल." त्यांनी चार प्रमुख पावले उचलण्याचे समर्थन केले. यामध्ये दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत थांबवणे, गुप्तचर माहिती सामायिकीकरणाला गती देणे, तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणे आणि तपास आणि न्यायालयीन कार्यवाहीत सहकार्य वाढवणे यांसारख्या मुद्यांचा समावेश आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व देशांनी ओम बिर्ला यांचे मुद्दे एकमताने स्वीकारले आणि अंतिम घोषणेत समाविष्ट केले. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संयुक्त जाहीरनाम्यात भारताच्या पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि सर्व ब्रिक्स देशांच्या संसदांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र काम करण्याचे मान्य केले. दहशतवादाव्यतिरिक्त बैठकीत 'एआय', जागतिक व्यापार, आंतरसंसदीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.
मुंबई तरुण भारत ८/६/२५