'हायवे' चा बनला 'रनवे'! 'गंगा एक्स्प्रेस वे'वर लढाऊ विमाने

Vartapatra    09-May-2025
Total Views |

sanskrutik vartapatra sanrakshan-ganga-expressway.jpg
 
शाहजहाँपूर - भारत-पाकिस्तान तणावाच्या  पार्श्वभूमीवर, भारतीय हवाई दलाने नुकतेच 'गंगा एक्स्प्रेस वे'वर शक्तिप्रदर्शन केले. उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर जिल्ह्यातील 'गंगा एक्स्प्रेस वे'च्या ३.५ किलोमीटर अंतरात हवाई दलाने शुक्रवारी लढाऊ विमाने उतरवण्याचा सराव सुरू केला. लढाऊ विमानांना २४ तास उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिलीच हवाई धावपट्टी ठरली आहे.

राफेल, जग्वार आणि सुखोई यांसारखी लढाऊ विमाने शाहजहाँपूरच्या जलालाबादमध्ये बांधलेल्या हवाई पट्टीवर उत्तरली. तत्पूर्वी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी हवाई दलाचे एएन-३२ विमान दाखल झाले. विमानाने सुमारे पाच मिनिटे प्रदक्षिणा घातली. यानंतर धावपट्टीवर लैंडिंग करण्यात आले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विमानांनी येथून उड्डाण केले. 'गंगा एक्स्प्रेस वे'वर सुमारे दीड तास 'एअर शो'  झाला. ते पाहण्यासाठी परिसरातील शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक तेथे उपस्थित होते. या दरम्यान कटरा-जलालाबाद महामार्ग तीन तास बंद राहिला.
 
हवाई पट्रीच्या रात्रीच्या लँडिंग क्षमतेचीही चाचणी घेण्यासाठी दिवस-रात्र या विमानांचे  लँडिंग केले जाणार आहे.