जम्मू-काश्मीरमधील कारागृहांवर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता

Vartapatra    06-May-2025
Total Views |

sanskrutik vartapatra dahashatvad_jk-prisons-on-high-alert-post-pahalgam-terror-attack
 
जम्मू-काश्मीर : पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर जम्मू-काश्मीरमदील कारागृहांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. आतंकवादी कारागृहांवर आक्रमण करू शकतात, विशेषतः श्रीनगरमधील मध्यवर्ती कारागृह आणि जम्मूमधील कोट बलवाल कारागृह यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील कारागृहांमध्ये अनेक कुख्यात आतंकवादी आणि त्यांना साहाय्य करणारे लोक आहेत, जे आतंकवाद्यांना रसद पुरवतात, तसेच लपण्याचे ठिकाण सांगतात. ४ मे या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी श्रीनगरमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आणि कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी पावले उचलण्याचा आदेश देण्यात आला. पहलगाम येथील आक्रमणाच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे निसार आणि मुश्ताक यांची कारागृहात जाऊन चौकशी केली. त्यांच्यावर सैन्याच्या वाहनावर आक्रमण केल्याचा आरोप आहे.

सनातन प्रभात ५/५/२५