भुवनेश्वर – ओडिशातील राऊरकेला येथे नक्षलवादी स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटल्याची घटना समोर आली आहे. या ट्रकमध्ये दीड टन स्फोटके भरली होती. हा ट्रक राउरकेला येथील केबलांग पोलीस ठाण्याच्या परिसरातून बांको दगडखाणीकडे जात होता. नक्षलवाद्यांनी ट्रक थांबवून त्याच्या चालकाला ओलीस ठेवले. नक्षलवाद्यांनी बलपूर्वक ट्रक सारंडाच्या घनदाट जंगलात नेला. या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशा राज्यांतील पोलीस सतर्क झाले आहेत.
सनातन प्रभात २८/५/२५