'पाक' मिश्रित मिठाईची चर्चा

Vartapatra    27-May-2025
Total Views |
 
Sasnkrutik Vartaptra_Anya_49
भारत पाकिस्तानमधील संघर्ष आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान किंवा पाक असा शब्द असलेल्या अनेक गोष्टींवर अघोषित बंदी आली. पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्किये येथील पदार्थांनाही यासाठीच विरोध झाला.
जयपूरमधील एका मिठाईच्या दुकानाने दक्षिण भारतातील प्रसिद्ध मिठाई 'म्हैसूरपाक' चे नाव बदलून 'म्हैसूरश्री' केले आहे तर 'मोतीपाक' या मिठाईचे नावही 'मोतीश्री' करण्यात आले आहे. याचे कारण म्हैसूरपाक आणि मोतीपाक या शब्दांत असलेला 'पाक' या शब्दाला देशाच्या काही भागात विरोध झाला.विविध शहरांमध्ये विक्रीसाठी असलेल्या मिठाईच्या नावाला विरोध करण्यात आला. हा सारा प्रकार सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला.
हैद्राबादच्या कराची बेकरीपुढेदेखील मोठी निदर्शने झाली आणि दुकानासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या.
मिठाईच्या नामांतराची घटना 'दुर्मिळातील दुर्मिळ' अशीच म्हणता येईल.
सकाळ २७.५.२५
Untitled Document