२० हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला दाहोद येथील रेल्वे कारखाना पुढील १० वर्षात १ हजार २०० इंजिन्स तयार करेल. यांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याची योजना आहे.
हा १०० टक्के ‘मेक इन इंडिया’ उपक्रम असून सध्या इथे चार इंजिनांचे उत्पादन सुरु आहे. या सर्वांवर ‘ दाहोदमध्ये उत्पादित’ असे लेबल असेल. या प्रकल्पामुळे १० हजार लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल.
मुंबई तरुण भारत २२.५.२५