धुळ्यात ख्रिस्ती मतांतरणाचा डाव उधळला

Vartapatra    24-May-2025
Total Views |

Sanskrutik Vartapatra_khrishchyaniti_7
 
धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात काही महिला येशूचे पुस्तक वाटत होत्या. या पुस्तकामुळे असाध्य आजार बरे होतात, जीवनातील संकटे दूर होतात, जीवनाचे कल्याण होते असा दावा त्या करत होत्या. तेव्हा तेथील एका कार्यकर्त्याच्या हे लक्षात येऊन त्याने त्यांना हटकले तेव्हा त्या महिला तात्काळ तिथून निघून गेल्या. त्यांनी आणलेली तब्बल दीड हजार पुस्तकं जप्त करण्यात आली. सजग हिंदुंनी केलेल्या अशा विरोधामुळे मतांतरण करण्याचा त्यांचा हा कट उधळला गेला. या महिलांवर आता गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
 
vsk,देवगिरी आणि झेप मराठी २२.५.२५