'भार्गवास्त्र' क्षेपणास्त्र करणार आकाशात ड्रोनच्या झुंडीचा नाश

Vartapatra    24-May-2025
Total Views |

sanskrutik vartapatra vidnyan_bhargavastra-india-drone-defence-success.jpg
 
नवी दिल्ली: अलीकडेच भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानची झोप उडवली आहे. भारताच्या अत्याधुनिक शस्त्रांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. आता भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी विकसित सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही प्रणाली स्वार्म ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ‘भार्गवास्त्र’ नावाच्या बहुस्तरीय प्रति-ड्रोन प्रणालीची चाचणी १२ आणि १३ जानेवारी रोजी गोपालपूर सीवार्ड फायरिंग रेंज येथे घेण्यात आली. मोठ्या प्रमाणावरील ड्रोन हल्ल्यांना निष्प्रभ करण्यासाठी किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण अशा या प्रणालीने अडीच किलोमीटरहून अधिक दूर असलेल्या निर्धारित आभासी लक्ष्यांवर यशस्वीरित्या हल्ला केला.

भार्गवास्त्र’ हे अत्याधुनिक क्षमतांनी सुसज्ज आहे, ज्यात ६ किलोमीटरहून अधिक अंतरावर येणारे अगदी लहान ड्रोन शोधणे समाविष्ट आहे. हे अचूकता आणि परिणामकारकता सुनिश्चित करून मार्गदर्शित सूक्ष्म-शस्त्रांचा वापर करून धोक्यांना निष्प्रभ करते. जलद तैनातीसाठी मोबाइल प्लॅटफॉर्मवर बसवता येणारी ही प्रणाली, भारताच्या सशस्त्र दलांच्या अद्वितीय परिचालन गरजा पूर्ण करण्यासाठी, उंचीच्या क्षेत्रासह विविध भूभागांमध्ये अखंडपणे काम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.



लोकमत, १५ मे २०२५