हुबळी - कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील २८ वर्षीय बी. फार्मा पदवीधर असलेल्या सौरभ कामरा यांनी प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करण्यासाठी आपल्या करिअरवर पाणी सोडले. त्यांनी ९ वर्षांत ३० हजारांहून अधिक आजारी आणि जखमी प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत. पाळीव प्राणी असोत किंवा रस्त्यावर फिरणारे भटके प्राणी असोत, ते कोणाचेही दुःख पाहू शकत नाहीत. कोणताही प्राणी किंवा पक्षी वेदनांनी विव्हळताना दिसला की ते त्याच्यावर प्रथमोपचार करतात. स्वत:च्या घरी आणतात. ते बरे झाल्यानंतर, त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.
त्यांना जखमी प्राण्यांना किंवा पक्ष्यांना वाचवण्यासाठी दररोज १०-१२ फोन येतात. आवश्यकता असल्यास ते शस्त्रक्रियेची व्यवस्था करतात आणि पशुवैद्यकीय डॉक्टर आणि रुग्णालयांशी समन्वय साधतात. यावर दररोज सुमारे १०००-१५०० रुपये खर्च होतात. हा खर्च भागवण्यासाठी ते एक छोटी मेस आणि किराणा दुकान चालवतात. बऱ्याचदा प्राणीप्रेमी यातील खर्चाचा काही भाग उचलतात.
दैनिक भास्कर १९.५.२५