सध्याच्या काळात हवेचे तथा वायूचे प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या झालेली दिसून येते आणि त्यामुळे होणारे वातावरणातले बदल हे संपूर्ण सजीव जातीला भेडसावणारे आहेत. वर्षाला सात लाखाहून अधिक लोकं श्वसनाच्या तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांनी मरण पावतात. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या ४७ लाखाहून अधिक लोकांनी शुद्ध हवा मिळण्यासाठी खात्रीशीर आणि कायमस्वरूपी उपाय केले जावेत अशी मागणी जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्याकडे केली आहे.
ही मागणी आता जागतिक आरोग्य संघटनेकडून बहुतेक देशांच्या त्या त्या संबंधित विभागांकडे केली जात आहे. वायू प्रदूषणाचे प्रचंड नुकसान ओळखून, आरोग्य समुदाय विविध देशांना प्रदूषित वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी, कडक हवेच्या गुणवत्तेचे मानके लागू करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे संक्रमण करण्यासाठी त्वरित आणि महत्त्वाकांक्षी पावले उचलण्याचे आवाहन करत आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी तसेच पृथ्वीच्याच आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकेल. २०२५ मध्ये होणाऱ्या असंसर्गजन्य रोगांवरील (एनसीडी) संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीपूर्वीदेखील हा विषय चर्चेत असेल, जिथे जागतिक नेत्यांना अधिक कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले जाईल.
जागतिक आरोग्य संघटना
मार्च,२५