भारतीय वायू सेनेचे हवाई अभियान
Vartapatra 19-May-2025
Total Views |
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय वायू सेनेने पाकिस्तानी एअर डिफेन्स जाळ्यावर अर्थात रडार आणि एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम, विमानवेधी तोफखाने यांच्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवलं. मोदी सरकारने २०२१ मध्ये संशोधन आणि संरक्षण वापर वगळता अन्य सर्व प्रकारच्या ड्रोन आयातीवर कठोर निर्बंध घालून देशांतर्गत ड्रोन डिझायनिंग आणि उत्पादन यासाठी घसघशीत आर्थिक अनुदानाची योजना आणली, त्याचीच फळे आपल्याला या कायनेटिक मिलिटरी ऑपरेशन्सच्या दरम्यान बघायला मिळाली.
भारताच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतीय वायू सेनेने फक्त २३ मिनिटांच्या कालावधीत 'सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स,SEAD' ची उद्दिष्ट पूर्ण केली होती. अर्थात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या ठिकाणांवर दुसऱ्या दिवशी केलेल्या हल्ल्यात उत्तर देण्याची रूपरेषा तयार असल्याशिवाय हे अशक्य होतं. हवाई दलाने केलेल्या या अभियानासंदर्भात अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vsk,देवगिरी