मालवणमध्ये ९१ फूट उंच शिवपुतळ्याचे अनावरण

Vartapatra    17-May-2025
Total Views |

 
sanskrutik vartapatra aitihasik_1 (1)

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ९१ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण आणि पूजन रविवारी करण्यात आले. हा पुतळा समुद्री वादळांना

सहज तोंड देऊ शकेल आणि पुढील १०० वर्षे दिमाखात उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उंचीच्या दृष्टीने हा देशातील शिवरायांचा सर्वात उंच पुतळा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोकण हा प्रांत महत्वाचा असून इथे पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या शिवपुतळ्यामुळे शिवरायांच्या स्मारकाला भव्यता आणि प्रेरणा मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता १२.५.२५