सैन्याला उच्च जोखीम असलेल्या वातावरणात जावे लागू नये म्हणून काम सुरू असून, मानवाच्या वरच्या आणि खालच्या शरीरासाठी प्रोटोटाइप विकसित केले गेले आहेत. हा रोबो कठीण भूप्रदेशांवर काम करण्यासाठी डिझाइन केला आहे, अशी माहिती कार्यशाळेत शास्त्रज्ञांनी दिली.
पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी एका कार्यशाळेत काही प्रमाणात विकसित केलेल्या यंत्रमानवाचे प्रोटोटाईप प्रथमच सादर केले. त्यात तो फक्त हातांची हालचाल करताना दिसत आहे.
ही प्रणाली तीन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. मानवी स्नायूंप्रमाणे हालचाल निर्माण करणारे अॅक्युएटर, आजूबाजूच्या परिसरातून रिअल टाइम डेटा गोळा करणारे सेन्सर्स आणि कृतीच्या मार्गदर्शनासाठी या माहितीचा अर्थ लावणारी नियंत्रण प्रणाली.
डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन पाय आणि चार पाय असलेले रोबो संरक्षण आणि सुरक्षा तसेच आरोग्यसेवा, घरगुती मदत, अंतराळ संशोधन आणि उत्पादनसारख्या क्षेत्रात प्रचंड क्षमतेने काम करतात.
पुढारी १२.५.२५