पुण्यातील तरुणीने केली 'पाकिस्तान जिंदाबाद' पोस्ट; कोंढव्यात गुन्हा दाखल

Vartapatra    13-May-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra islamic_22
 
एकीकडे भारत-पाक संघर्ष सुरू असताना येथे पुण्यातील एका तरुणीने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी पोस्ट केल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. तसेच, कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'सकल हिंदू समाजा'ने ही माहिती 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 'सकल हिंदू समाजा'ने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात शिक्षण
घेणारी ही तरुणी तिच्या 'इंस्टाग्राम' हॅण्डलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहीत होती. तिने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे 'इंस्टाग्राम' अकाऊंट डिलीट केले. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
 
मुंबई तरुण भारत १०/५/२५