'तुर्की बॅन' चा ट्रेंड , देशासाठी खरेदी टाळली

Vartapatra    12-May-2025
Total Views |
 
Sanskrutik Vartapatra_Antarrashtriya_1
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीत जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. अशावेळेस तुर्कीने मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी 'बॅन तुर्की' हा ट्रेंड चालवत तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार घातला आहे.
भारतात तुर्की सफरचंदांचा हंगाम चांगला चालतो. इतर देशांतील सफरचंदापेक्षा तुर्की सफरचंद परवडते, यंदा उत्पादन कमी असले तरी तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या देशाखातर तुर्कीकडून खरेदी बंद केली आहे.
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. राज्यासह पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांऐवजी इराण,वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडच्या सफरचंदाला पसंती दिली आहे.
भारत पाकिस्तान तणावामुळे परदेशातील सफरचंदाच्या व्यवहारावरदेखील परिणाम झालेला आहे.
सकाळ १२.५.२५.