पुण्यात १०-११ मे रोजी बचत गटांचा सहकार महोत्सव

Vartapatra    10-May-2025
Total Views |

sanskrutik vartapatra mahila_sahakar-mahotsav-pune-2025.jpg
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून ११ जानेवारी १९७९ रोजी सहकार भारतीची स्थापना झाली.
केंद्रात सहकार खाते असावे, त्यावर कॅबिनेट मंत्री असावा यासाठी सहकार भारतीने पाठपुरावा केला अन् त्याला यश आले. वित्तसंस्था, डेअरी, बचत गट, आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यटन, सौरऊर्जा, ग्राहक भांडार, गॅस एजन्सी, सेवा क्षेत्र, पेट्रोल पंप, गृहनिर्माण संस्था, विपणन क्षेत्र अशा ५५ क्षेत्रांची निवड करून सहकार भारतीचे कार्यकर्ते देशात सुसंस्कारीत सहकार रुजविण्यास प्रयत्नशील आहेत.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. या निमित्ताने सहकार भारती पुणे महानगराने सहकार महोत्सवाचे आयोजन केले आहे. १० व ११ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे हा महोत्सव होईल. यात स्टॉलवर बचत गटातील महिलांनी बनवलेली पारंपरिक व नावीन्यपूर्ण उत्पादने, लोणची, वाळवण, पापड, मसाले, मातीची भांडी, हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ, आदिवासी चित्रकलेच्या पर्स, बॅगा, टोप्या, आकर्षक अॅक्सेसरीज, कोकण मेवा, ड्रेस मटेरिअल, साड्या, विविध प्रकारची फळे, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल, सौंदर्य प्रसाधने, मोत्यांचे दागिने, तोरण, पूजा साहित्य, रानभाज्या अशा विविध वस्तूंची विकी व प्रदर्शन असे सहकार महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. या महोत्सवात बचत गटांचे १०० स्टॉल असतील.
या महोत्सवात पुणे महानगरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बचत गटातील उत्पादने खरेदी करावीत, असे आवाहन सह‌कार भारती, पुणे यांनी केले आहे.

सकाळ १०.५.२५