भोपाळ- मध्य प्रदेशातील मंडला जिल्हात बुधवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत प्रत्येकी १४ लाख रुपयांचे वक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या.
पोलिसांनी सांगितले की, बिछिया पोलिस स्टेशन हद्दीत ही चकमक झाली.चकमकीच्या ठिकाणाहून एक सेल्फ-लोडिंग रायफल, एक साथी रायफल, एक वायरलेस सेट आणि काही दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. इतर नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे मकवाना यांनी सांगितले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, दोन्ही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. दोन्ही महिला नक्षलवादी एमएमसी (मध्य प्रदेश-महाराष्ट्र-छत्तीसगड) झोनच्या केबी (कान्हा भोरमदेव) विभागाच्या भोरमदेव क्षेत्र समितीच्या सदस्य होत्या.
लोकमत ३.४.२५