नंदुरबार- नवापूर तालुक्यात मौजे कडवान इथे किसान पाच्या वळवी या जनजाती व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. 'इव्हान्जेलीकल अलायन्स ख्रिश्चन चर्च ट्रस्ट चिंचपाडा कौन्सिल' तर्फे होणाऱ्स्या संजीवनी सभेस विरोध केला म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने ख्रिश्चनांनी त्यांच्यावर आक्रमण केले.
किसान यांनी वेळोवेळी गावातील अवैध चर्च बांधकामे आणि अवैध कार्यक्रम याविषयी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या. पण पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.
आक्रमणकर्त्यांवर कोणतीही कारवाई न करता किसन यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. किसन हे जखमी अवस्थेत इस्पितळात असताना त्यांची भाषा न समजणाऱ्या अधिकाऱ्याने त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
किसान यांना न्याय मिळावा म्हणून जनजाती समाज लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहे.
सनातन प्रभात ४.४.२५