काडेपेटीचा शोध: ब्रिटनचे रसायनशास्त्रज्ञ जॉन वॉकर यांनी १८२७मध्ये आजच्याच दिवशी काडेपेटीचा शोध लावला. ते स्टॉकटनचे रहिवासी होते. प्रयोगशाळेत त्यांनी लाकडाच्या एका छोट्या काडीवर विशिष्ट प्रकारचे रसायन लावले. ती काडी खडबडीत पृष्ठभागावर घासली असता तिने पेट घेतला. वॉकर यांनी त्याला कॉनग्रीव्स असे नाव दिले होते. मात्र त्यांनी त्याचे स्वामित्व हक्क घेतले नव्हते. कालांतराने फ्रान्स व अन्य देशांनी या तंत्रात अधिक प्रगती साधली आणि १८३०च्या दशकात सुरक्षित काडेपेटीची सुविधा उपलब्ध झाली.
चॅटजीपीटीच्या अनुसार भविष्यात या पारंपरिक काडेपेटीच्या जागी नॅनो इग्निशन यंत्राची सुविधा निर्माण होऊ शकते. केवळ स्पर्श केल्यानंतर हे यंत्र ज्वाळा निर्माण करू शकेल. या स्मार्ट थर्मल स्टिक्स बायोमेट्रिक ओळखीनंतरच कार्यान्वित होतील, त्यामुळे आग लागण्याच्या दुर्घटना टळतील. सिंथेटिक बायोलॉजीद्वारे रासायनिक संकेतांच्या आधारे प्रकाश अथवा उष्मा निर्माण करतील.
महाराष्ट्र टाइम्स ०७/०४/२५