जागतिक आरोग्य दिन २०२५: "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य"

माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार, तपासण्या आणि वैद्यकीय सेवा गरजेच्या

Vartapatra    07-Apr-2025
Total Views |
७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. सुदृढ आरोग्य ही मानवाची मूलभूत गरज असून प्रत्येक व्यक्तीला योग्य आरोग्य सेवा मिळणे हा त्याचा हक्क आहे. आजही अनेक आजारांविषयी अनेकांना माहिती नसते त्याविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एक विशिष्ट संकल्पना वापरून ती अमलात आणली जाते. त्याप्रमाणे या वर्षीची संकल्पना आहे " निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य" ही आहे. ही संकल्पना माता आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि त्यांचा मृत्यूदर कमी करण्यावर भर देते. भारतात अजूनही नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यावर उपाय म्हणून गरोदर महिलांनी योग्य आहार, वेळेवर तपासण्या करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे आहे.
 

world-health-day-2025-india-theme-maternal-child-health_sanskrutik vartapatra 
डॉ. अस्मिता जगताप.
 
सकाळ, आरोग्य पुरवणी.७.४.२५