पंढरपूर : उन्हाळ्यात पांडुरंगाला थंडावा मिळावा, यासाठी चंदनाचा लेप लावण्यास सुरुवात झाली. चंदन उटी पूजेसाठी म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागविण्यात आले. रुक्मिणी मातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वाढत्या उन्हापासून श्री विठ्ठठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रात पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदन-उटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली.
चंदनात मिसळतात केशर देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या रोजच्या चंदन-उटी पूजेसाठी दीड किलो उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते.यामध्ये म्हैसूर येथून मागवलेले केशर घालण्यात येते. विठुराया आणि रुक्मिणी मातेला रोज दुपारच्या पोशाखाच्या वेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड-आरतीच्या वेळी काढण्यात येते.
लोकमत, ३.४.२५