गुजरात: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरात सरकारने परदेशी नागरिकांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी अहमदाबाद आणि सुरतमधील अनेक भागात छापे टाकले आणि ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. त्यापैकी बहुतेक बांगलादेशी नागरिक आहेत.
अहमदाबादमध्ये ४०० हून अधिक आणि सुरतमधून १०० हून अधिक बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. काही लोकांकडे भारतीय आधार कार्ड सापडले आहे. पोलिसांनी सर्वांचे फोन जप्त केले आहेत.
गुजरात पोलिस परदेशी नागरिकांना पकडण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणता येत आहे.
दिव्य मराठी २६.४.२५