लखनौ: (Ram Mandir) १४ एप्रिल रोजी अयोध्येतील राम मंदिरावर विधीपूर्वक कलश स्थापित करण्यात आला. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की , सकाळी ९:१५ वाजता वैदिक परंपरेनुसार महापुरूषांनी विधी केले आणि सकाळी १०:३० वाजता पूजा संपली.
वैदिक विधींनंतर, यंत्रे आणि क्रेनच्या मदतीने कलश मंदिराच्या शिखरावर ठेवण्यात आला.
चंपत राय म्हणाले की, वैशाखीच्या शुभ मुहूर्तावर आणि बाबा साहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी मंदिराच्या बांधकामात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.
"पुढील टप्प्यात मंदिराच्या मुख्य शिखरावर 'ध्वजदंड' बसवण्यात येईल. एकूण बांधकामाचे काम सातत्याने सुरू आहे," असे त्यांनी सांगितले.
चंपत राय यांनी असेही सांगितले की आता मंदिर परिसरातून बांधकाम यंत्रसामग्री काढून टाकली जाईल. हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे.
इंडियन एक्स्प्रेस १४.४.२५