निर्जलीकरण भाग ३

Vartapatra    19-Apr-2025
Total Views |

sanskrutik-vartapatra-krushi_oven-drying-process-for-vegetables-and-fruits-increases-shelf-life.jpg
ओव्हन निर्जलीकरण (Oven Drying):
ओव्हन निर्जलीकरण म्हणजे नियंत्रित तापमान असलेल्या भट्ट्यांचा वापर करून भाज्या आणि फळांमधली आर्द्रता काढून घेण्याची प्रक्रिया. या पध्दतीत गरम हवा प्रवाहित करून भाज्यांमधील पाणी वाफेच्या रूपाने काढले जाते.
ओव्हनमध्ये भाज्या ठेवून त्यांना गरम हवेत सुकवले जाते, ज्यामुळे त्यांचे वजन कमी होते आणि आर्द्रता कमी होते. भाज्या दीर्घकाळ टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे.
प्रक्रियाः
ओव्हन निर्जलीकरणाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे नियंत्रित तापमान आणि हवेचा प्रवाह. भाज्या सुकवताना ओव्हनमध्ये हवा नियंत्रित तापमानावर ठेवली जाते, ज्यामुळे वाफेचे प्रमाण आणि सुकवण्याचा वेग नियंत्रित करता येतो. तापमान सामान्यतः ५० डिग्री सें.ग्रे. ते ७० डिग्री सें.ग्रे. दरम्यान असते, हे भाज्या आणि फळांच्या प्रकारावर अवलंबून असते.
ओव्हन निर्जलीकरणाच्या प्रमुख फायद्यातील एक म्हणजे हवेचा प्रवाह आणि तापमान नियंत्रित करणं, यामुळे भाज्या गुणवत्तेचे योग्य नियंत्रण करता येते. प्रक्रिया जलद होते आणि भाज्या सुकवताना त्या गळून जात नाहीत. या पद्धतीमध्ये सुकवलेल्या भाज्यांची चव, रंग आणि पोत टिकून राहतो.
ओव्हन निर्जलीकरणासाठी विशिष्ट उपकरणे आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. या उपकरणांमध्ये उच्च दर्जाच्या भट्ट्यांचा वापर केला जातो, ज्यात तापमान आणि हवेचा प्रवाह सहजतेने नियंत्रित करता येतो. ओव्हनमध्ये हवा गरम केली जाते आणि ह्या गरम हवेत भाज्या ठेवून त्यांना सुकवले जाते.
ओव्हन निर्जलीकरणासाठी आवश्यक असलेली उपकरणे आणि तंत्रज्ञान हे महागडे असू शकतात. या पध्दतीसाठी विशेष औद्योगिक यंत्रणांची आवश्यकता असते, ज्यामुळे प्रारंभिक खर्च जास्त असतो.
उच्च तापमानामुळे वाफ, इत्यादींमुळे प्रदूषण होऊ शकते, आणि त्यामुळे यासाठी वायुरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे.
 
क्रमश:
कृषी पणन मित्र , एप्रिल २५