भारताच्या प्राचीन ग्रंथांमध्ये ‘हिंदू’ हा शब्द कोठेही नाही. हिंदू धर्माला ‘सनातन धर्म’ म्हटले जात असे. याला बौद्ध संप्रदाय ‘धम्म’ म्हणतात. काही विशेष परिस्थितीमुळे हिंदू हे नाव नंतर रूढ झाले. १९२९ मध्ये आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांनी लिहिलेल्या लेखात असे म्हटले आहे की झरतृष्ट जेव्हा पर्शिया किंवा आजच्या इराणला पोहोचले तेव्हा तिथल्या समाजाने त्यांना गुरु म्हणून स्वीकारले आणि त्यांना त्यांचा परिचय देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले की आमचे पूर्वज सिंधू नदीच्या पलीकडून आले. फारसी भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ असा केला जातो, त्यामुळे त्यांनी सिंधूचे ‘हिंदू’ करून टाकले. तेथपासून त्यांनी आपल्या गुरुला ‘हिंदू गुरु’ असे संबोधले. तिथून इस्रायलशी होणाऱ्या व्यापाऱ्यामुळे हा शब्द तिथेही पोहोचला. आणि मग व्यापाऱ्यांच्या द्वारे तो आपल्या बौद्धिक जगतात पोहोचला. अशाप्रकारे हिंदू हा शब्द रूढ झाला आणि हिंदू जिथे राहतात ते स्थान म्हणून ‘हिंदुस्थान’ हाही शब्द रूढ झाला.
संदर्भ : भविष्यातील भारत, सरसंघचालक मोहनजी भागवत.