
बीरगंज (नेपाळ) - बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या रक्सौल प्रांताला लागून असलेल्या बीरगंज (नेपाळ) येथे १२ एप्रिलला हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. या वेळी मुसलमानांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यामुळे भारत-नेपाळमधील रक्सौल-बीरगंज भागातील सीमा बंद करण्यात आली.
१. बीरगंज महानगर क्षेत्रातील छपाकिया येथे हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्यावर अचानक छतावरून मुसलमानांकडून विटा आणि दगड यांचा वर्षाव चालू झाला. ज्यामध्ये अनेक हिंदू घायाळ झाले आणि परिस्थिती बिघडली. काही क्षणातच जमाव हिंसक झाला. अनेक दुकाने आणि वाहने यांना आग लावण्यात आली. या हिंसाचारात सुमारे ५० जण घायाळ झाले. यात अनेक पोलिसांचाही समावेश आहे.
२. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळ पोलिसांनी अश्रूधुराचा वापरही केला. गंभीर परिस्थिती लक्षात घेता नेपाळ प्रशासनाने बीरगंजमध्ये संचारबंदी लागू केली.
३. बिहारच्या रक्सौलमधील अनेक लोक बीरगंजमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करतात; हिंसाचारामुळे अनेक व्यापारी बीरगंजमध्ये अडकले आहेत. त्यांनी त्यांची दुकाने बंद केली आहेत आणि ते त्या परिसरात लपून बसले आहेत.
भारत-नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे आणि ते आता त्यांचे उपद्रव मूल्य दाखवू लागले आहेत. याविरोधात आता भारताने कठोर कारवाई केली पाहिजे !
सनातन प्रभात १४.४.२५