रायपूरमध्ये पाच मित्रांनी बांधली ७८ घरे

Vartapatra    18-Apr-2025
Total Views |

sanskrutik-vartapatra-anya_raipur-punjabi-friends-build-homes-for-migrants-no-rent-conditions.jpg 
छत्तीसगडमध्ये, रायपूरमधील ५ मित्रांनी आपल्या कमाईचा एक दशांश भाग वाचवला आणि ७८ घरे बांधली, जेणेकरून पंजाबमधून उदरनिर्वाहाच्या शोधात येणारे लोक झोपडपट्टीत राहू नयेत. जगजित सिंग खनुजा, जगजित सिंग अरोरा, जर्नेल सिंग भाटिया, दिलीप सिंग छाबरा आणि गुरमीत सिंग सैनी हे स्वत: पंजाबमधून नोकरीसाठी एकदा इथे आले होते. त्यामुळे त्यांच्या समस्या आम्हाला समजल्या. म्हणून त्यांनी देवपुरीत घरे बांधायला सुरुवात केली. प्रथम १६ कुटुंबांना येथे आश्रय मिळाला. जसजशी घरे बांधली जात होती तसतशी लोकांची वस्ती वाढत गेली. आता ७८ घरांमध्ये ३५० सदस्य एका कुटुंबाप्रमाणे राहतात. ज्यांच्याकडे सायकलही नव्हती त्यांनी आता कार घेतली आहे. वृद्धांसाठी ७ खोल्या बांधण्यात आल्या असून त्यामध्ये ६ वृद्ध राहत आहेत. या वसाहतीचे व्यवस्थापन श्रीगुरु अमरदास सेवा समिती करत आहे.
येथे राहणाऱ्या लोकांकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही. फक्त एकच अट त्यांना घातली आहे की कोणीही अमली पदार्थांचे सेवन करणार नाही किंवा मांस खाणार नाही. प्रत्येक घरासाठी ५०० ते १००० रुपये देखभाल शुल्क आकारण्यात येते.

दैनिक भास्कर ३१/३/२५