उधमपूर: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. उधमपूर पोलिसांनी 'एक्स' वर सांगितले की, पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या शोध मोहिमेदरम्यान उधमपूरच्या रामनगर पोलिस स्टेशन क्षेत्रातील जोफर गावात तीन दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. खब्बलच्या उत्तरेला जोफर गाव आहे.याच ठिकाणी सुरक्षा दलांनी ३ एप्रिल रोजी दहशतवाद्यांना पाहिले होते.
कठुआ जिल्ह्यात दहशतवादी कारवाया झाल्यापासून उधमपूर पोलीस कठुआ सीमेवरील मजलता ब्लॉकच्या चोरे पंजवा खब्बल भागात सतर्क होते. कठुआ जिल्ह्यातील सानियाल भागात २३ मार्चपासून सुरू झालेल्या कारवाईनंतर तीन चकमकीनंतर गेल्या १७ दिवसांपासून पोलीस आणि सुरक्षा दल एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून आहेत.
नवभारत १०/४/२५