बुरखा घातलेल्या महिलेचा विनातिकीट प्रवास, प्रवाशांना धमक्या

Vartapatra    15-Apr-2025
Total Views |

sanskrutik-vartapatra-islamic_1burqa-woman-indian-railway-incidentभारतीय रेल्वेच्या एका एसी डब्यात घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बुरखा घातलेली एक महिला विनातिकीट प्रवास करत असल्याचा आरोप असून, तिने दुसऱ्या प्रवाशाचे आरक्षित सीट जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचे दिसते.

जेव्हा ट्रॅव्हलिंग टिकीट एक्झामिनर (TTE) आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) अधिकारी तिच्याकडे तिकीट मागतात, तेव्हा ती महिला सहकार्य करण्याऐवजी आक्रमकपणे वागत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते.

“पंतप्रधानांना विचार,” असे म्हणत तिने अधिकाऱ्यांना उत्तर दिले की, “मी तिकीट दाखवणार नाही!” या संपूर्ण प्रकारामुळे कोचमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून इतर प्रवासी देखील घाबरल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला शांत करण्यास अपयश आल्याचे दिसते.

प्रकरण आणखी चिघळले जेव्हा संबंधित महिलेने इतर प्रवाशांना धमकावले आणि काही प्रवाशांशी हातघाई केल्याचाही आरोप आहे. व्हिडिओमध्ये तिने एका पुरुष प्रवाशाला धमकावत म्हणताना ऐकू येते, “कापून तुकडे करून टाकीन, जास्त बडबड केली तर…”

न्यूज डंका ९.४.२५