बिकानेर: राजस्थानमधील बिकानेर येथील वर्षीय पानीदेवी गोदाराने नुकत्याच बेंगळुरू येथे झालेल्या ४५ व्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शॉटपुट, १०० मीटर शर्यत आणि डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक जिंकून आपली उत्कृष्ट फिटनेस आणि क्रीडा क्षमता सिद्ध केली आहे. ऑगस्टमध्ये स्वीडनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे पानीदेवींचे पुढील लक्ष्य आहे. याशिवाय सप्टेंबरमध्ये इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेतही त्यांची निवड झाली असून, या स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
त्यांचे हे यश केवळ बिकानेरसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. शिक्षण आणि योग्य दिनचर्या अंगीकारून कोणत्याही वयात यश मिळवता येते, हे आजच्या महिलांनी त्यांच्या संघर्षातून आणि परिश्रमातून शिकावे.
एन डी टीव्ही इंडिया २१/०४/२५