जुन्नरमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी महिला अटकेत; बनावट कागदपत्रांचा वापर उघड

Vartapatra    14-Apr-2025
Total Views |

sanskrutik-vartapatra antargat_Bangladeshi mother and son arrested in Junnar.jpg 
जुन्नर येथील शिपाई मोहल्ल्यातील रिजवान हाईट्स या इमारतीत बांगलादेशी नागरीक असल्याची माहिती जुन्नर पोलिसांना मिळाली होती. आतंकवादविरोधी पथक, पुणे आणि जुन्नर पोलीस यांनी नुकतीच ही कारवाई करत साथी उपाख्य सनम मंडल या महिलेस तिच्या बाळासह अटक केल होती. पती शाह आलम अब्दुल मंडल याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता स्वत: बांगलादेशी नागरिक असल्याचे महिलेने सांगितले. ‘पतीसमवेत रहात असून आपल्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. आपण भारतात प्रवेश केल्यानंतर बनावट कागदपत्रे मिळवली. यात आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, तसेच वाहनचालक परवाना आणि पारपत्र मिळाले’, असे महिलेने सांगितले.

सनातन प्रभात ८/४/२५