दिलसुखनगर बाँबस्फोट प्रकरणी ५ जिहादी आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा कायम

Vartapatra    12-Apr-2025
Total Views |

sanskrutik_vartapatra_dilsukhnagar-bomb-blast
दिलसुखनगर: भारताने बंदी घातलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ५ आतंकवाद्यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा तेलंगणा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. वर्ष २०१३ मध्ये भाग्यनगरमधील दिलसुखनगर येथे झालेल्या २ बाँबस्फोटांत हे आतंकवादी सहभागी होते. या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १३१ जण घायाळ झाले होते.
१३ डिसेंबर २०१६ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक महंमद अहमद सिद्दीबापा उपाख्य यासिन भटकळ, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उपाख्य वकास, असदुल्ला अख्तर उपाख्य हड्डी, तहसीन अख्तर उपाख्य मोनू आणि एजाज शेख यांना दोषी ठरवले होते.

सनातन प्रभात ०८/४/२५