कालीघाट मंदिर : चैत्र नवरात्रीत देशभरातील दुर्गादेवीच्या शक्तिपीठांमध्ये संपूर्ण नऊ दिवसांच्या काळात पूजा-आराधनेची परंपरा आहे. काेलकात्याच्या कालीघाट मंदिरात त्यापेक्षा वेगळे चित्र दिसते. येथे या काळात विशेष पूजा केली जात नाही. पूजेची दिनचर्या मात्र पूर्ण केली जाते. परंतु अष्टमी माेठ्या उत्साहात आणि सर्वात वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.
मंदिराच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी काैन्सिल ऑफ सेवायतचे सदस्य इंद्रजित हलदारनुसार या नवरात्रीत आमच्यासाठी अष्टमी विशेष असते. या दिवशी मंदिर प्रांगणातच राधा-कृष्णाची पूजा हाेते. पूजेनंतर सायंकाळी हाेलिकादहन हाेते. नंतर गुलालाने रंगाेत्सव साजरा हाेता. राधा-कृष्णाला पालखीत बसवून मंदिराबाहेर नियाेजित मार्गावरून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर दाेघांना कालिकामातेच्या चरणी रात्रभरासाठी साेडून दिले जाते. ही परंपरा १०० वर्षांहून जास्त वर्षांची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाराणी व प्रभू श्रीकृष्णाला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान केले जाते. नवरात्रीत विशेष पूजनाची परंपरा असलेले हे देशातील एकमेव शक्तिपीठ आहे. ही अनाेखी परंपरा पाहण्यासाठी देश-परदेशातील भाविक आतापासूनच शहरात दाखल हाेत आहेत. दरराेज पहाटे मंगलारतीने मंदिराची दारे उघडली जातात. दुपारी महाभाेजनासाठी एका बकऱ्याचा बळी दिला जाताे. सायंकाळी शीतल भाेग असताे. त्यात पुडी, आलू भजी असतात. रात्री झाेपतेवळी रसगुल्ल्याचा नैवेद्य दाखवतात. आपली पिढी अनेक शतकांपासून हे सर्व पार पाडत आली आहे. असे का केले जाते याचे कारण आम्हाला अद्यापही माहीत झालेले नाही. मंदिर समितीचे सदस्य इंद्र बॅनर्जी म्हणाले, या मंदिरात कालीने विविध काळात घेतलेल्या विविध रूपांची पूजा केली जाते. दुर्गापूजनात दुर्गा, कालीपूजनात माता लक्ष्मीचेही पूजन केले जाते. त्याशिवाय साेबत शीतला व मनसारूपातही पूजन करतात.
दैनिक भास्कर ०३/०४/२५