भारताची सर्वात हळू ट्रेन: उटी-निलगिरी एक्स्प्रेसचा प्रवास

ही ट्रेन ५ तासांत फक्त ४६ किमी अंतर कापते! युनेस्कोच्या वारसात समाविष्ट

Vartapatra    29-Mar-2025
Total Views |

sanskrutik vartapatra_india-slowest-train-ooty-nilgiri-express-speed-tamilnadu
 
भारतातील सर्वात स्लो ट्रेन (bharat-slowest-train) इतकी हळू धावते की तिला 290 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी १० तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे हे अंतर तुम्ही तुमच्या ऑटोमध्येही कापले तर तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचाल. एकीकडे भारतात ट्रेनचा वेग वाढवण्यावर भर दिला जात असताना एका ट्रेनकडे देशातील सर्वात स्लो ट्रेनचे बिरुद आहे. ही ट्रेन खूप स्लो आहे, पण तरीही लोक या ट्रेनमध्ये आनंदाने बसतात.

तामिळनाडूतील मेट्टुपालयम स्टेशन ते उटी येथील उधगमंडला स्थानकापर्यंत धावणाऱ्या निलगिरी माउंटन एक्स्प्रेसचे नाव सर्वात स्लो ट्रेनच्या यादीत नंबर वनला आहे.सर्वात हळू चालणाऱ्या या ट्रेनचे नाव आहे उटी-निलगिरी. (ooty-nilgiri express) ही ट्रेन ५ तासात ४६ किमी अंतर पार करते, म्हणजेच १ तासात फक्त ९ किमी अंतर कापते. ट्रेन डोंगर आणि उतारावरून जाते.ही ट्रेन ४६ किमीच्या प्रवासात १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ घुमावदार टर्न्समधून जाते. या ट्रेनच्या प्रवासादरम्यान तुम्हाला पश्चिम घाटाची अनेक सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. यामुळेच याचा युनेस्कोच्या जागतिक वारसामध्येही समावेश करण्यात आला आहे.या ट्रेनची एक खास गोष्ट म्हणजे या ट्रेनला जायला ५ तास लागतात, पण परतायला फक्त साडेतीन तास लागतात, त्यामुळे ट्रेनला जाताना खडी टेकडी चढून जावे लागते. म्हणजेच जाताना या ट्रेनचा वेग ताशी ९ किलोमीटर राहतो. पण परतताना, उतार उतरताना वेग वाढतो.

झी २४ तास १९/०१/२५