सासवड (Saswad) (ता. पुरंदर) येथील हेमाडपंती अतिभव्य दगडी शिवालय श्री चांगावटेश्वर (changawateshwar-mandir) मंदिरातील संगमरवरी श्री गणेशमूर्तीला सकाळी ६.४५ वाजता सूर्यकिरणे (suryakiran) न्हाऊ घालत असल्याचे दृश्य दिसत आहे, हे दृश्य साधारणपणे ३ ते ४ दिवस असते, हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
श्री चांगावटेश्वर (changawateshwar) (महादेव) मंदिरात पहाटे पूजा करण्यात येते. श्री चांगावटेश्वर महादेव मंदिर जमिनीपासून ५० फूट उंचीवर आहे. चारही बाजूंना मोठी झाडे आहेत. मंदिराचा गाभारा खूप आत आहे. असे असूनही सूर्यकिरणे गाभाऱ्यातील गणेशमूर्ती व शिवपिंडीवर येत आहेत. वसंताच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरव्या पानांचा आणि रंगीबेरंगी फुलांचा अल्हाददायक शालू लपेटते. या दृश्याने पाहणाऱ्यांची मनेही मरगळ झटकून उल्हसित होतात. हाच अनुभव सासवडकरांना येत आहे.
पुढारी २३.३.२५