खारघर (kharghar) इज्तिमा गर्दी (ijtima-crowd) वाढल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली असून, विधिमंडळात या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
मुंबई - पनवेलजवळील खारघरमध्ये ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत 'अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासीमुल उलूम हक्कानिया मशीद' या संस्थेने आयोजित केलेल्या इज्तिमाला केवळ ५० सहस्र व्यक्ती उपस्थित रहातील, असे पत्र आयोजकांनी सिडकोला दिले होते. (इज्तिमा म्हणजे मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे) प्रत्यक्षात तेथे ३ लाखांहून अधिक मुसलमानांची गर्दी जमली होती, अशी धक्कादायक माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडकोच्या कार्पोरेट पार्क येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला सिडकोकडून देण्यात आलेली अनुमती पडताळण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देतांना दिली.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले, "३०० स्वयंसेवक वाहतूककोंडी रोखण्यासाठी, ३०० स्वच्छता कर्मचारी, ३०० सुरक्षेसाठी इत्यादी एकूण १ सहस्र २०० स्वयंसेवक तैनात करण्याची ग्वाहीही आयोजकांनी दिली होती. इज्तिमा आयोजनाच्या ठिकाणी उत्सव चौकात शिवकुमार शर्मा यांना 'हेल्मेट'ने मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा जीव गेला, तेथे ना वाहतूक पोलीस उपस्थित होते, ना आयोजकांचे स्वयंसेवक, पोलीस चौकीत जाऊन शिवकुमार शर्मा यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला; पण ७-८ मिनिटांत त्यांचा जीव गेला. स्वयंसेवकांपैकी कुणीच त्यांच्या साहाय्याला आले नाही. अशा वेळी ज्याने दायित्व घेतले, त्यांनी ते पार पाडले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे.
सनातन प्रभात २३.३.२५