आसामचे लेखक लक्षीराम दुवरा दास : भाजीविक्रेत्याची १८ पुस्तके

फुटपाथवर भाजी विकणाऱ्या लेखकाने लिहिल्या १८ आध्यात्मिक पुस्तके

Vartapatra    27-Mar-2025
Total Views |

sanskrutik_vartapatra_assamese-writer
 
मणिकांचन संयोग, श्रीमद्भागवत शब्दार्थ, श्रीकृष्ण गीता शब्दार्थ... आसामी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकांचे लेखक भाजीविक्रेते आहेत. नाव लक्षीराम दुवरा दास. देशातील सर्वात मोठे नदी बेट असलेल्या माजुली येथील कैवर्ते गावचे ते रहिवासी, परंतु गेल्या २० वर्षांपासून जोरहाटमधील फुटपाथवर भाजीपाला विकत आहेत. त्यांनी १८ पुस्तके लिहिली आहेत. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिक्षण सोडावे लागले तेव्हा ते बीएच्या शेवटच्या वर्षाला होते. ते म्हणतात- माझे पहिले पुस्तक ‘हरिभक्ती अमृतवाणी’ लिहिले तेव्हा कोणीही ते छापण्यास तयार नव्हते. घर विकले. ५० हजार मिळाले. त्यातून हे पुस्तक प्रकाशित झाले. सुंदर बुढागोहाई आसाम पोलिसात आहेत. त्यांनी लक्ष्मीरामची सर्व पुस्तके वाचली आहेत. ते म्हणतात- त्यांची पुस्तके आपल्याला स्वतःचे मूल्यांकन करण्यास भाग पाडतात.

घरावर हल्ला, मग अध्यात्माकडे वळले लक्षीराम म्हणतात की काही तरुणांनी घरावर हल्ला केला. सर्व सामान तोडले. कारण माहीत नव्हते, पण मी आत्मपरीक्षणास सुरुवात केली. मला वाटले की कुठेतरी मी काहीतरी चूक केली असेल तेव्हाच ही घटना घडली. यानंतर माझी आध्यात्मिक पुस्तकांमध्ये आवड वाढू लागली.

आसाम साहित्य सभेचा पुरस्कार लक्षीराम यांना आसाम साहित्य सभेने पुरस्कार दिला. ‘आसाम भाषा गौरव’ योजनेअंतर्गत आसाम सरकारने सन्मानित केले. कोच राजवंशी विद्यार्थी संघटनेनेही सन्मान केला.

दिव्य मराठी २४/०३/२५