नवी दिल्ली China Ladakh Border Dispute - विस्तारवादी वृत्तीच्या चीनची भारताविरोधात आगळीक सुरूच आहे. नुकतीच चीनने लडाखला लागून असलेल्या सीमावर्ती भागात दोन नवीन काउंटी स्थापन केल्याची घोषणा केली. गंभीर बाब म्हणजे या काऊंटीचा काही भाग भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशात येतो. चीनच्या या घोषणेवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारकडून याबाबत शुक्रवारी लोकसभेत माहिती देण्यात आली.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी नमूद केले आहे, भारत सरकारने या क्षेत्रातील भारतीय भूभागावर चीनचा बेकायदेशीर ताबा कधीही मान्य केलेला नाही.
नवीन काउंटी स्थापन केल्याने या क्षेत्रावरील भारताच्या सार्वभौमत्वाबाबत दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण भूमिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. चीनच्या बेकायदेशीर आणि जबरदस्तीने मिळवलेल्या ताब्याला वैध मानले जाणार नाही, असे कीर्तीवर्धन सिंह यांनी स्पष्ट केले.
पुढारी २३.३.२५