महाराष्ट्रातील शाळांत महिलाराज ! पुरुषांचे प्रमाण कमी

Vartapatra    22-Mar-2025
Total Views |

Mahila22.03.2025 
नवी दिल्लीः भारतात प्रथमच सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षकांत महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत ५३.३ टक्के इतकी झाली आहे.
 
२०२३-२४ साठी यूडीआयएसई प्लसच्या अहवालानुसार देशात शिक्षिकांची ही आतापर्यंत सर्वाधिक आकडेवारी आहे. २०१८-१९ मध्ये शाळांत पुरुष शिक्षक अर्ध्यापेक्षा अधिक होते. तेव्हा ९४.३ लाख शिक्षकांपैकी ४७.१६ लाख (५०.०१ टक्के) पुरुष होते. सध्या भारतात पुरुष शिक्षकांची संख्या ४५ लाख ७७ हजार २६, तर शिक्षिकांची संख्या ५२ लाख ३० हजार ५७४ आहे. देशात सध्या ९८ लाख ७६ हजार शिक्षक आहेत.
 
केरळमध्ये सर्वाधिक ८० टक्के शिक्षिका
केरळ, पंजाब आणि हरयाणामध्ये शिक्षिकांची संख्या अनुक्रमे ८० टक्के, ७६ टक्के आणि ६४.७३ टक्केपर्यंत आहे, तर राजस्थानसारख्या राज्यांमध्ये सध्याही पुरुष शिक्षकांची संख्या अधिक आहे. हे प्रमाण ६० टक्के इतके आहे.
केरळमध्ये सरकारी शाळांमध्ये ७८ टक्के शिक्षिका आहेत, तर तामिळनाडू (६७ टक्के) आणि दिल्लीत (६१ टक्के) शिक्षिका आहेत.
 
दृष्टी , फेब्रुवारी २०२५