तापमानाचा ताण सहन करणाऱ्या गव्हाच्या जाती

Vartapatra    22-Mar-2025
Total Views |

Krushi22.03.2025
 
 
गहू हे विशेषतः उत्तर आणि मध्य भारतातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे गहू पिकाच्या उत्पादनात अडचणी येत आहेत, २०२२ मध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे भारतातील गव्हाचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले होते, त्यामुळे उच्च तापमानाला सहनशील असणाऱ्या गव्हाच्या जातींची लागवड करणे महत्त्वाचे आहे.
 
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील प्रमुख डॉ राजबीर यादव आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अशा काही जाती विकसित केल्या आहेत. या जाती चांगले उत्पादन देतात तसेच उष्णतेचा ताण सहन त्यांची चांगली क्षमता आहे. तसेच चपातीसाठी उत्तम आहेत.
 
उत्पादनाची गुणवत्ता आणि फायदे :
एचडी ३३८५ :
ही जात पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली या संस्थेमध्ये नोंदणीकृत झाली आहे. उत्तर आणि मध्य भारतात या जातीची लागवड वाढली आहे.
तांबेरा आणि कर्नाल बंट रोग प्रतिकारक जात.
■ फुटव्यांची क्षमता अधिक. शिफारस केलेल्या बियाणांच्या मात्रेपेक्षा एकरी १० ते १५ किलो बियाणे कमी लागते.
■ उंची ९०-९८ सेंटिमीटर असून, खोड मजबूत आहे त्यामुळे पीक पडत नाही.
■ उत्पादन क्षमता सरासरी ६५ क्विंटल प्रति हेक्टर.

एचडी ३४१० आणि एचडी ३३८८ :
■ या जातींची मध्य प्रदेश, दिल्ली आणि पूर्व भारतातील राज्यांसाठी शिफारस.
■ उच्च उत्पादनाबरोबर वाढते तापमान सहन करण्याची क्षमता. चपातीसाठी अत्यंत उपयुक्त.
■ मध्य प्रदेशात एचडी ३४१० या जातीचा मोठ्या प्रमाणात प्रसार
■ मोठ्या चमकदार दाण्यांमुळे चांगला दर, निर्यातीसाठी पसंती.
 
 
ॲग्रोवन ४.१२.२४