नागपूर- औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी 'विश्व हिंदू परिषद' (विहिंप) आणि 'बजरंग दला'च्या कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी नागपूर येथील महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्यानंतर पिसाळलेल्या धर्मांध कट्टरपंथीयांनी चिटणीस पार्क जवळ दगडफेक केल्याने दोन गटांत मोठा राडा झाला. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले.
त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. तणावग्रस्त परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
मुंबई तरूण भारत १८.३.२५